शिर्डी पुणे हायवेवर 3 मृतदेह सापडले

November 26, 2008 11:06 AM0 commentsViews: 17

26 नोव्हेंबर, संगमनेरशिर्डी-संगमनेर-पुणे हायवेवर हिवरगाव-पावसे इथं एका स्कॉर्पिओ गाडीत तीन मृतदेह आढळले आहेत. एक महिला आणि दोन पुरुषांचे हे मृतदेह आहेत. गाडीचा नंबर एम एच-06 डी- 3701 असा आहे. ती काळ्या रंगाची आहे. संगमनेरपासून आठ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. मृत व्यक्तींपैकी एकाचं नाव अशोक नागवेकर असून अन्य दोघे जण त्यांच्याच कुटुंबातील असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पोलिसांना घातपात झाल्याचा प्रथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

close