मांडूळ जातीचा साप बाळगणार्‍यास अटक

July 6, 2012 12:43 PM0 commentsViews: 161

06 जुलै

औषधांसाठी वापरण्यात येणारे मांडूळ जातीचे साप बेकायदेशीरपणे बाळगणार्‍या एका व्यक्तीला ठाण्यात अटक करण्यात आली आहे. या सापांची किंमत 60 लाख रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. वागळे इस्टेट गुन्हे विभागाला मिळालेल्या माहितीनुसार खेवरा सर्कल इथं डी मार्ट जवळ त्यांनी सापळा रचून एका इसमाला पकडले. या माणसाची झडती घेतली असता त्यांना मांडूळ जातीचे 5 साप मिळाले. पण साप कोणाकडून विकत घेतले याच शोध घेत पोलिसांनी कांदिवली इथं राहाणार्‍या मोहम्मद शकील शेख या व्यक्तीला अटक केली. हे सर्व साप हे सर्पमित्र मनोज सूर्यवंशी यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

close