परभणीत मुजोर कृषी केंद्रांनी ठेवले ‘शटर’ बंद

July 6, 2012 2:40 PM0 commentsViews: 7

06 जुलै

परभणीतल्या मोंढा कृषी बाजारात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. सरकारने सुरू केलेल्या कारवाईविरोधात कृषी केंद्र संचालकांनी हा बंद पाळला. ऐन पेरणीच्या काळात झालेल्या या बंदमुळे शेतकर्‍यांचं मात्र नुकसान होतंय. परभणी जिल्ह्यातल्या कृषी केंद्रांमध्ये एमआरपीपेक्षा जास्त दरानं बियाणं विक्री सुरू होती. ही बातमी आयबीएन लोकमतने दाखवताच राज्य सरकारने धडक कारवाई सुरू केली. तब्बल 9 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित केले. यामुळे या केंद्रांमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान, 24 तासाच्या आत दुकानं सुरू केली नाही तर दुकानं फोडून टाकू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला.

close