रितेश ‘मनसे’ सिनेमात

July 6, 2012 3:47 PM0 commentsViews: 67

07 जुलै

राजकारणात काँग्रेस आणि मनसे एकत्र नसले तरी आता सिनेमासाठी दोघंही एकत्र येत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मराठी सिनेमाची निर्मिती करत आहेत आणि या चित्रपटात केंद्रीय विज्ञानमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव रितेश देशमुख मुख्य भूमिकेत असणार आहे. त्यामुळे राजकारणाच्या पटलावर 'डिश्यूम डिश्यूम' करणारे विरोधक मात्र चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत आहे. राज यांच्या या सिनेमाचे दिग्दर्शन निशिकांत कामत करत आहेत. तर महाराष्ट्राचे लाडके संगीतकार अजय-अतुल संगीत देणार आहेत. पण या सिनेमाचे नाव अजून नक्की व्हायचंय आहे. आणि लवकरच या सिनेमाची घोषणाही होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा सिनेमा नेमका कसा असणार आहे हे पाहण्याचं ठरेल.

close