जलसिंचन प्रकल्पांना लवकरच विशेष पॅकेज – पवार

July 7, 2012 3:26 PM0 commentsViews: 16

07 जुलै

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळी भागात अनेक प्रकल्प निधीअभावी अपुरे पडले आहेत आता या अपुर्‍या जलसिंचन प्रकल्पांना केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज मिळणार आहे. अशी घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज सांगलीत केली. सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद यासारख्या दुष्काळी भागात अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत. त्या प्रकल्पांना आता याची मदत होणार आहे.

close