उपराष्ट्रपतीपदी पुन्हा एकदा हमीद अन्सारी ?

July 9, 2012 9:08 AM0 commentsViews: 2

09 जुलै

एकीकडे राष्ट्रपतीपदाची निवडणूक रंगात आली असताना आता काँग्रेसने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. हमीद अन्सारी यांना पुन्हा एकदा उपराष्ट्रपती करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे अन्सारींच्या नावासाठी आग्रही असल्याचं समजतंय. समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, जनता दल संयुक्त आणि जनता दल धर्मनिरपेक्ष तसेच डाव्या पक्षांशीही काँग्रेसनं अन्सारींच्या नावाला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. पण काँग्रेसनं ममता बॅनर्जी यांना यासंदर्भात संपर्क साधण्यात आला नसल्याचं समजतंय.

close