नागपुरात महिला प्रसाधनगृहांचा अभाव

November 26, 2008 11:17 AM0 commentsViews: 8

26 नोव्हेंबर, नागपूरकल्पना नळसकरशहराचा विकास करण्याची आणि लोकांच्या समस्या सोडवण्याची संपूर्ण जबाबदारी असते ती महानगरपालिकेची. नागपूर शहरात महिलांसाठी प्रसाधनगृहच नसल्यानं प्रवास करताना महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. विशेष म्हणजे नागपूर शहराच्या महापौर एक महिला असतानाही ही परिस्थिती आहे.नागपुरातल्या झाशी राणी चौकातला बस स्टॉप महत्त्वाचा मानला जातो. शहरात कुठही जायचं असेल तर इथूनच बसं पकडावी लागते. पण एवढ्या महत्त्वाच्या ठिकाणीही इथ स्त्रियांसाठी कुठेही स्वच्छतागृह नाही. "या बस स्टॉपवर फक्त पुरुषांसाठीच प्रसाधनगृह आहेत.महिलांयाठी ईथे प्रसाधन गृह नाही.पण महिलांसाटी प्रसाधन गृह असाव असं मला वाटतं" असं हेमा गावंडे यांनी सांगितलंही समस्या फक्त झाशी राणी चौकापूरती मर्यादित नाही.तर ही संपूर्ण शहरामध्ये महिलांना भेडसावणारी समस्या आहे.पण ही समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिका कोणतीही ठोस उपाययोजना कारतांना दिसत नाही. विस्तारलेल्या शहरामुळं महिलांना कामानिमित्त एका ठिकाणावरुन दुस-या ठिकाणी नेहमीच ये- जा करावी लागते. पण प्रसाधनगृहं नसल्यानं त्यांची कुचंबणा होते. महानगरपालिकेनं यावर अगदी बोटावर मोजण्याइतकी सोय केली आहे. "नागपूर शहरात दोन ठिकणी प्रसाधन गृह आहेत. आता आम्ही तयार करत आहोत. तो विषय प्रस्तावित आहे" अशी माहिती नागपूरच्या महापौर माया इवनाते यांनी दिली. महानगरपालिका शहराच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च करते. पण महिला महापौर असतानाही स्त्रियांच्या समस्यांकड मात्र दुर्लक्षच होताना दिसतंय.

close