पंजाबमध्ये आफ्रिकन विद्यार्थ्याला जबर मारहाण

July 6, 2012 5:05 PM0 commentsViews: 5

06 जुलै

पंजाबमधल्या हॉस्पिटलमध्ये कोमात असलेल्या एका आफ्रिकन विद्यार्थ्याच्या बातमीनं सध्या खळबळ माजली आहे. दोन महिन्यांहून जास्त काळ लोटलाय पण पोलीस किंवा प्रशासनाकडून त्याला कसलीच मदत मिळत नाही. यानिक असं त्याचं नाव आहे. अफ्रिकेतल्या बुरुंडीमधून तो शिक्षणासाठी पंजाबला आला होता. इथल्या लव्हली विद्यापीठात तो केमिकल इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षात होता. 21 एप्रिलला त्याला कॉलेजमधल्या काही विद्यार्थ्यांनी जबर मारहाण केली. तेव्हापासून तो कोमात आहे. त्याच्या वडिलांनी आर्थिक मदतीसाठी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना दोन पत्रंही लिहली. पण त्याला काहीच उत्तर आलेलं नाही. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडेही मदतीसाठी विनंती केलीय. यानिकला मारहाण करणार्‍यांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि लष्करी अधिकार्‍यांची मुलं सहभागी असल्याचीही चर्चा आहे.

close