‘टाईम’च्या टीकेवरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल

July 9, 2012 9:28 AM0 commentsViews: 6

09 जुलै

मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून कामगिरी अतिशय सुमार राहिली असा ठपका 'टाईम' मॅगझिनने ठेवलानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.देशाच्या या परिस्थितीला पंतप्रधानांना इतक्याच सोनिया गांधीही जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. 'टाईम'च्या नव्या अंकात पंतप्रधानांच्या कामगिरीची समीक्षा करण्यात आली आहे. आर्थिक अडचणीची काळात मनमोहन सिंग यांनी गेली तीन वर्ष वाया घालावली, असं परखड मतही या अंकात मांडण्यात आलंय. इतकंच नाही प्रणव मुखर्जी यांच्या राजीनाम्यानंतर सिंग अर्थमंत्री म्हणून कितपत भक्कम भूमिका बजावतात, यावरही प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलंय. विशेष म्हणजे मार्चमध्ये टाईम मॅगझिनमध्ये नरेंद्र मोदींची मात्र स्तुती करण्यात आली होती.

close