मेडिकल स्टोर्स चालकांचा आंदोलनचा इशारा

July 9, 2012 9:34 AM0 commentsViews: 2

09 जुलै

अन्न आणि औषध प्रशासनाच्या निर्णयाविरोधात राज्यातील मेडिकल स्टोर्स चालकांच्या संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे. 11 जुलैपासून 17 जुलै पर्यंत फक्त 8 तासच मेडिकल स्टोर्स उघडी ठेवण्यात येणार असल्याचही जाहिर केलंय. तर 18 ते 20 जुलै असे 3 दिवस मेडिकल्स पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. राज्यातील वाढत्या गर्भालिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्येच्या घटनांमुळे राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाने गर्भपातासंदर्भातील औषधं फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच देण्याचा आदेश काढला आहे. या निर्णयाला आपला विरोध असल्याच महाराष्ट्र केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोशिएशन्सचे सेक्रेटरी पसद दानवे यांनी सांगितलंय.

close