औरंगाबाद:किशोर शर्माच्या घरीच चालायचा वेश्याव्यवसाय

July 7, 2012 10:07 AM0 commentsViews: 40

07 जुलै

औरंगाबाद मधील सामूहिक बलात्कार प्रकरणात आता नवीन धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणातला आरोपी किशोर शर्मा याच्या घरीच वेश्याव्यवसाय चालत होता. औरंगाबादच्या उच्चभ्रु समजल्या जाणार्‍या गारखेडा परिसरात डीवायएसपी शर्मांनी भाड्यानं घर घेतलं होतं. याच घरात ते वेश्याव्यवसाय चालवत होते. नागरिकांना याचा त्रास होऊ लागल्याने नागरिकांनी पोलीस आयुक्तांना एक निवेदनही सादर केले मात्र कारवाई झाली नाही. याप्रकरणी किशोर शर्माची आई जयश्री शर्मालाही अटक झाली आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे किशोर शर्मा याचे वडिल हे माजी डिवायएसपी आहेत.

close