तहसील कार्यालयात जनावरे बांधून आंदोलन

July 9, 2012 10:00 AM0 commentsViews: 9

09 जुलै

जून महिना संपला तरी पावसाचा अजुनही पत्ता नाही. त्यामुळे दुष्काळी भागातली स्थिती बिकट बनली आहे. सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी या दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकर्‍यांसमोर संकट उभं राहिलंय. पिण्याच्या प्रश्न गंभीर झालाय माणसांना प्यायला पाणी मिळत नाही तिथे जणावरांचीही बिकट अवास्था आहे अखेर आज दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयातच आपली जनावरे बांधून आंदोलन केलं. जनावरांसाठी चारा छावण्यांमध्ये अर्ज विनंत्या करून सरकारी अधिकारी दाद देत नसल्यानं शेतकर्‍यांनी चारा आणि पाणी मिळावा यासाठी गेल्या चार दिवसांपासून या शेतकर्‍यांनी आपली गुरं तहसील कार्यालयातच बांधून ठेवली आहे. आता तरी आमच्या मागण्यांकडे लक्षं द्या अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. जनावरांचे चार्‍याविना हाल पाहुन सरकारने आता तरी लक्ष द्यावं अन्यथा आम्हाला जणावर कत्तलखान्यात विकावी लागतील असा जळजळीत प्रश्न शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.

close