रॉजर ‘सातवे आसमान पे’

July 9, 2012 10:15 AM0 commentsViews: 1

09 जुलै

ग्रास कोर्टचा बादशाह रॉजर फेडररने तब्बल सातव्यांदा विम्बल्डनचं विजेतेपद पटकावलं आहे. फायनलमध्ये त्यानं ब्रिटनच्या ऍण्डी मरेचा 4-6. 7-5, 6-3,6-4 असा चार सेट मध्ये पराभव केला आहे. या विजेतेपदासह फेडररनं पीट सॅम्प्रसच्या सर्वाधिक 7 वेळा विम्बल्डनचं विजेतेपद पटकावण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. गेली दोन वर्ष फेडररला विजेतेपदानं हुलकावणी दिली होती. मात्र अखेर रॉजरने यश संपादन केलं आहे.

close