एफडीआयच्या कारवाईविरोधात औषध विक्रेते एकवटले

July 10, 2012 10:07 AM0 commentsViews: 19

अलका धुपकर, मुंबई

10 जुलै

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी एफडीआयने गेल्या महिन्याभरात अनेक केमिस्टवर कारवाई केली. ज्या डॉक्टरांना अधिकार नसताना त्यांनी एमटीपी (MTP) कीट किंवा शेड्यूल्ड ड्रग्जचं प्रिस्क्रीप्शन दिलं असेल आणि त्या चुकीच्या प्रिस्किप्शनवर केमिस्टनी औषधं दिली असतील तर त्यांच्याविरोधात कारवाई केली जातेय. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी एफडीआयने सुरु केलेल्या या धडक कारवाईविरोधात आता केमिस्ट असोसिएशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत डॉक्टर सेल संघटीत झाले आहेत.

6 जूनपासून अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातल्या मेडिकल स्टोअर्सकडे मोर्चा वळवला. गर्भपातासाठीच्या औषधांची बेकायदेशीर विक्री करणार्‍या 200 हून अधिक केमिस्टविरोधात त्यांनी चक्क IPC अंतर्गतच गुन्हे नोंदवले. केमिस्टनी संप पुकारण्याऐवजी स्त्रीभ्रूण हत्या रोखायला मदत करावी, असं आवाहन FDA ने केलंय.

ऍलोपॅथी व्यतिरीक्त च्या होमिओपॅथी, इलेक्ट्रोपॅथी, युनानी या पॅथीजना शेड्यूल्ड ड्रग्जचा सल्ला देण्यास बंदी आहे. पण या क्रॉसपॅथीला परवानगी मिळावी, अशी मागणी केलीय खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलने. कायद्याची कडक अंमलबजावणी होत असल्यामुळे केमिस्ट आणि डॉक्टर संप पुकारत आहे आणि याचा फटका बसतोय तो सामान्य पेशंट्सना.

close