पंचगंगा नदी प्रदूषण प्रकरणी खटला दाखल

July 10, 2012 10:45 AM0 commentsViews: 145

10 जुलै

कोल्हापूर जिल्हात इंचलकरंजी येथे काविळीमुळे 16 जणांचा मृत्यू झाला आहे या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या पंचगंगा नदी प्रदूषण प्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे. इचलकरंजी नगरपालिकेचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाचे इंजीनिअर यांच्याविरुध्द इचलकरंजी न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने ही कारवाई केली. याआधी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नोटीस देत या संबंधित अधिकार्‍यांवर खटला का दाखल करु नये अशी विचारणा केली होती. पंचगंगा नदीतल्या दूषित पाण्यामुळे कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये काविळीची साथ पसरली होती. या साथीत 16 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कोल्हापूर प्रादेशीक अधिकार्‍यांनी हा खटला दाखल केला आहे.

close