संगमांनी घेतली भाजप नेत्यांची भेट

July 10, 2012 10:56 AM0 commentsViews: 2

10 जुलै

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार पी ए संगमांनी प्रचाराला सुरुवात करत आज मुंबईत भाजप नेत्यांची भेट घेतली. राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी आणि पी ए संगमा यांच्या थेट लढत होत आहे. राजकीय नेत्यांचा पााठिंबा मिळवण्यासाठी संगमा आज मुंबईत दाखल झालेत. सकाळी त्यांनी विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसेंची भेट घेतली. संगमांनी यावेळी आपल्याला मतदान करण्याचं आवाहन केलं. संगमांना या अगोदरच एनडीएनं पाठिंबा दिला आहे. मात्र एनडीएचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेनं प्रणवदांना पाठिंबा दिला.

close