लवासाला झटका;आदिवासींना मिळणार जमिनी परत

July 9, 2012 12:13 PM0 commentsViews: 3

09 जुलै

आदिवासींची जमीन हडप केल्याप्रकरणी लवासाला मोठा झटका बसला आहे. लवासाच्या ताब्यातील दोन आदिवासींची जमीन परत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लवासानं आपल्या जमिनी हडप केल्याचा आरोप 9 आदिवासींनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर त्यांना आदिवासी असल्याची कागदपत्र सादर करायला सांगण्यात आली. त्या कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर मावळच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी दोन आदिवासींना जमिनी परत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे लवासाविरोधील आदिवासींनी मोठा दिलासा मिळाला आहे.

close