पर्सेंटाइल प्रकरणी राज्य सरकारची समिती

November 26, 2008 11:31 AM0 commentsViews: 1

26 नोव्हेंबर, पुणेपर्सेंटाईल प्रकरणी सरकारनं तज्ज्ञांची समिती नेमली असून गरज पडली तर सरकार सर्वोच्च न्यायालयात जाईल असं शालेय शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 11 वीच्या प्रवेशावेळी पर्सेंटाइलच्या मुद्द्यावरून गोंधळ झाला होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑफीसचं नवीन वास्तूमधे स्थलांतर झालं. शालेय शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या हस्ते मंडळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटनानंतर पुरके पत्रकारांशी बोलत होते.

close