औषध विक्रेत्यांचा संप मागे

July 10, 2012 11:55 AM0 commentsViews: 12

10 जुलै

महाराष्ट्र केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनने उद्यापासून पुकारलेला राज्यव्यापी संप एकदिवसा आधीच मागे घेतला आहे. कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय आजचा संप मागे घेण्यात आला. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक,अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त महेश झगडे यांच्यासोबत केमिस्ट असोसिएशनची बैठक आज विधानभवनात झाली. पुढील चर्चेसाठी 25 जुलैच्या दरम्यान, आणखी एक बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. केमिस्ट असोसिएशन आणि एफडीए यांच्यातील गैरसमज समझोत्याने दूर करण्याचा प्रयत्न बैठकीत झाला.

अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील वाढत्या गर्भालिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्येच्या घटनांमुळे गर्भपातासंदर्भातील औषधं फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच देण्याचा आदेश काढला आहे. या निर्णयाविरोधात राज्यातील मेडिकल स्टोर्स चालकांच्या संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला होता. उद्या 11 जुलैपासून 17 जुलैपर्यंत फक्त 8 तासच मेडिकल स्टोर्स उघडी ठेवण्यात येणार आणि 18 ते 20 जुलै असे 3 दिवस मेडिकल्स पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार होते. मात्र, आज सरकारशी झालेल्या चर्चेमुळे संप टळला आहे.

close