पिंपरीत मुरुम चोरीला पोलिसांचा हातभार

July 9, 2012 2:46 PM0 commentsViews: 5

09 जुलै

पिंपरीतल्या मोशी गावाशेजारी शेकडो एकर पसरलेल्या जागेत शेकडो टन मुरुम चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार आयबीएन लोकमतने उघडकीस आणला होता. आयबीएन लोकमतच्या बातमीची दखल घेत चौकशीला सुरूवात झाली आणि आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. मुरूम चोरी करणारी वाहनं ही काही पोलीस कर्मचार्‍यांची असल्याचं महसूल विभागाच्या तपासातून उघड झालंय. पिंपरीतील मोशी गावाशेजारी तब्बल 17 कोटी रुपये खर्चून टाकलेली जलवाहिनी आणि ड्रेनेज लाईनही मुरुम चोरांनी पूर्णपणे उद्धवस्त केली. मध्यरात्री सशस्त्र गुंडांच्या पाहार्‍यात आणि महसूल आणि प्राधिकरण अधिकार्‍यांच्या संगनमताने ही मुरुम चोरी होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. याबाबत प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी मात्र काही बोलण्यास नकार दिला होता. याप्रकरणी चौकशी सुरु झाली. कंत्राटदार, स्थानिक रहिवाश्यांच्या जबाब नोंदवण्यात आलाय.

close