जादूटोणा कायदा मंजूर करु नये :हिंदू जनजागृती समिती

July 10, 2012 12:22 PM0 commentsViews: 154

10 जुलै

अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर आणि शाम मानव यांच्या दबावाखाली महाराष्ट्र सरकारने जादूटोणा विरोधी कायदा मंजूर करू नये. हिंदुत्ववादी तसेच वारकरी संघटनांशी या विधेयकाबाबत चर्चा करावी अशा मागण्याकरत हिंदू जनजागृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणी 12 जुलैला पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर मुंबईत आझाद मैदानात धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. या कायद्यामुळे पंढरपूरची वारी करता येणार नाही. सत्यनारायमाची पूजा केली जाणार नाही असे आक्षेप विरोध करणार्‍या संघटनांकडून घेण्यात येत आहेत.

close