‘स्पायडरमॅन’ची ‘अमेझिंग’ कमाई

July 10, 2012 1:23 PM0 commentsViews: 9

10 जुलै

गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या ऍमेझिंग स्पायडरमॅन सिनेमाचं कलेक्शन एकदम ऍमेझिंग झालंय. फक्त आशिया खंडात हा सिनेमा रिलीज झाला आहे. आणि भारतातलं वीकेण्डचं कलेक्शन 29 कोटी 10 लाखापर्यंत पोचलं. या आधी भारतात सुपर हिट ठरलेला अवतार सिनेमाचा रेकॉर्ड स्पायडर मॅननं मोडलंय. भारतात स्पायडरमॅन एकूण 1200 स्क्रीन्सवर झळकला तर अवतार 750 स्क्रीन्सवर. स्पायडरमॅन येत्या शुक्रवारी अमेरिका आणि युरोपमध्ये रिलीज होतोय.

या सिनेमाची कथा मागिली दोन भागांपेक्षा थोडीशी वेगळी जरी असली तरी सुध्दा नव्या पीटर पार्करला घेऊन नव्याने सुरुवात केली आहे. अभिनेता पीटरला कुठून तरी 'स्पायडर' चावतो आणि त्यामुळे पीटर 'स्पायडरमॅन' बनतो. मग पुढे काय… गुन्हेगारांची धुलाई,सफाई करणे. स्पायडरमॅनच्या पाठीमागे पोलिस दल लागणे आणि दुसरीकडे एका सायन्स कुअविष्कारातून महाभंयकर 'व्हिलन' ची एंट्री… मग काय शहराला वाचवण्यासाठी 'स्पायडरमॅन'ने जीवाची बाजी लावतो आणि शहराला सुखरुप वाचवतो…असं काही भव्यदिव्य स्पायडरमॅनमध्ये घडतं. पण आधुनिक तंत्रज्ञान, कॅमेरावर्क, स्पेशल इफेक्ट यामुळे सिनेमा बघण्याची मजा काही वेगळीच.. याच बळावर स्पायडरमॅनने बॉक्सऑफिसवर मोठी 'लूटमार' केली आहे.

close