पट-पडताळणीमध्ये दोषी 12 हजार शाळांवर होणार कारवाई

July 9, 2012 3:07 PM0 commentsViews: 1

09 जुलै

अखेर पट पडताळणी मोहिमेत दोषी आढळलेल्या 12 हजार शाळांवर कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. त्यामुळे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने आता पुन्हा कारवाईला सुरूवात केली आहे. या कारवाईविरोधात संस्थाचालक कोर्टात गेले होते. त्यांच्या याचिकेवर निर्णय देताना कोर्टाने संस्थाचालकांवरील कारवाईला स्थगिती देत शाळा प्रशासनावर कारवाई आणि दोषी शाळांवर फौजदारी कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या पटपडताळणी मोहिमे दरम्यान धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. यामध्ये 20 लाख 70 हजार 520 विद्यार्थी अनुपस्थित असल्याचा आकडा समोर आला. हा धक्का इथेच थांबला नाही यापुढे एक पाऊल टाकतं 25 टक्क्यांपेक्षा अधिक शाळा बोगसगिरी करताना दोषी आढळून आल्या होत्या. वर्ग हाऊसफूल्ल दाखवण्यात अनेक संस्थाचालकांचा भांडाफोड झाला होता.

close