मुरुम चोरी प्रकरणी पोलीस कर्मचार्‍यांची वाहनं जप्त

July 10, 2012 2:30 PM0 commentsViews: 24

10 जुलै

पिपरी चिंचवड प्राधिकरणातील जागेतील शेकडो टन मुरुम चोरी गेल्याच प्रकार आयबीएन लोकमतने उघड केला होता. या प्रकरणी मुरुम चोरी करण्यासाठी पोलीस कर्मचार्‍यांनी मदत केल्याचं तपासातून समोर आलं होतं. याप्रकरणी आज काही वाहनेही जप्त करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि तहसिलदारांना बोलावून संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. या संदर्भात आणखी दोन अज्ञातांविरुद्ध तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. तक्रार दाखल करुन अद्यापही पोलिसांनी या प्रकऱणी कुठलीही दखल घेतलेली नाही.

close