इंग्लंडची दमदार सुरुवात

November 26, 2008 11:46 AM0 commentsViews: 1

26 नोव्हेंबर कटकभारत आणि इंग्लंड दरम्यान कटक इथं सुरू असलेल्या वन डेमध्ये भारताने टॉस जिंकून इंग्लंडला पहिली बॅटिंग दिली.अ‍ॅलिस्टर कूक आणि रवि बोपारा यांनी फटकेबाजी करून सुरुवात चांगली केली. पण झहीरने अ‍ॅलिस्टर कूकला सहाव्या ओव्हरमध्ये आऊट केलं त्याने 10 रन्स केले. इंग्लंडच्या टीमला या मॅचमध्ये सामना करावा लागणार आहे तो कटकमधल्या उकाड्याशी. त्याशिवाय रात्रीच्या वेळी इथली आर्द्रताही 91 टक्क्यांपर्यंत वाढते. भारतीय टीमने या मॅचमध्ये दोन बदल केले आहेत. मुनाफ पटेल ऐवजी इरफान पठाणला संधी देण्यात आली आणि गंभीरला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याऐवजी रोहित शर्मा टीममध्ये परत आला आहे. सात मॅचच्या या सीरीजमध्ये भारतीय टीम चार शून्यने आघाडीवर आहे. रवि बोपाराने 24 रन्स केले त्यालाही झहिरने आऊट केलं.इंग्लंडचा कॅप्टन पीटरसनने हाफ सेंच्युरी पूर्ण केली तो 83 रन्सवर खेळत आहे. त्याच्याबरोबर शहाही खेळत 20 रन्सआहे . आत्तापर्यंत इंग्लंडने 40ओव्हरमध्ये चार विकेटवर 196 रन्स केले आहेत.

close