लैला खानच्या बंगल्यामागे 6 मानवी सांगाडे सापडले

July 10, 2012 3:06 PM0 commentsViews: 3

10 जुलै

बेपत्ता असलेल्या पाकिस्तानी अभिनेत्री लैला खान प्रकरणाचं गूढ दिवसेंदिवस वाढतंय. पण आता लवकरच या प्रकरणाचा गुंता सुटेल अशी शक्यता वाटतेय. लैला खान हिच्या इगतपुरीतल्या बंगल्याच्या मागच्या जागेत खोदकामात सहा मानवी सांगाडे सापडले आहेत. हे सहा मानवी सापळे हे लैला खानच्या कुटुंबीयांचे आहेत काय या संदर्भात तपास एटीएसने सुरु केला आहे. परवेज टाक यांने आपण लैला खान आणि तिच्या कुंटुबीयांची हत्या केल्याच सांगितलं होते. परवेज टाक यांच्या माहितीवरुनच इगतपुरीजवळच्या घराजवळ शोध सुरु केला होता.

लैला खानच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी परवेझ खानला अटक केली. परवेझची कसून चौकशी केली असता त्यांने धक्कादायक माहिती सांगितली. परवेझच्या सांगण्यावरून पोलिसांनी लैला खानच्या इगतपुरी येथील बंगल्याची तपासणी करत आहे. 250 पोलिसांचा फौजफाट बंगल्याची तपासणी करत आहे. यावेळी परवेझ सुध्दा हजर आहे. बंगल्याच्या मागी जागेत तीन फुट खोदकाम केले तेंव्हा पोलिसांना मानवी अवशेष सापडले आहे. हे अवशेष कोणाचे आहे हे मात्र अजून स्पष्ट झालं नाही. पोलीस दलाचे पथक लैलाच्या बंगल्यापासून जवळपास सहा किलोमिटर अंतरात तपासणी करत आहे. त्याचबरोबर कसारा घाटातही शोधाशोध सुरु आहे. परवेझच्या सांगण्यानुसार लैला खानची हत्या करुन तिचा मृतदेह बंगल्याच्या मागील जागेत दफन करण्यात आलाय. विशेष म्हणजे पोलिसांच्या हाती महत्वाचा धागा लागला आहे यावरून लवकरच लैला खानच्या हत्येचा खुलासा होण्याची शक्यता आहे. याअगोदर पोलिसांनी लैला खानचा ड्रायव्हर मेहबुब आणि चौकीदाराला अटक केली आहे.

close