स्त्री भ्रूण हत्येसाठी 302 अंतर्गत गुन्हा दाखल करा – आव्हाड

July 10, 2012 9:46 AM0 commentsViews: 17

10 जुलै

स्त्री-भ्रुणहत्या प्रकरणात गर्भ लिंग निदान करण्यासाठी प्रवृत्त करणार्‍या नातेवाईक आणि डॉक्टर्सवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आज अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी लक्षवेधी दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी ही मागणी केली. तर हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय. या अगोदर मागिल महिन्यात राज्यात स्त्रीभ्रूणहत्येचं वाढतं प्रमाण लक्षात घेता हा गुन्हा अजामीनपात्र करण्याचे राज्य सरकारने संकेत दिले आहे. लिंगनिदान करून स्रीभू्रणहत्येचा व्यवसाय करणार्‍या डॉक्टर्सवर वचक ठेवण्यासाठी सरकार हे पाऊल उचण्याची शक्यता आहे. अशा डॉक्टर्सना लगेचच जामीन मिळू नये, यासाठी कायद्यात कठोर तरतूद करण्याची भूमिका यामागे आहे. यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करण्याचा प्रस्ताव महिला आणि बालकल्याण विभागाने आरोग्य विभागाकडे पाठवला आहे.

close