तिकीटासाठी ‘तात्काळ’ नवी योजना ; एंजटबाबूंना चाप

July 10, 2012 5:53 PM0 commentsViews: 3

10 जुलै

तात्काळ तिकीटांमध्ये कशा प्रकारे घोटाळा होतो, याची बातमी आयबीएन नेटवर्कनं दाखवली होती. त्याची दखल घेत सामान्य प्रवाशांना तात्काळ तिकीट सहज उपलब्ध व्हावीत यासाठी रेल्वे प्रशासनाने आजपासून नवीन यंत्रणा सुरू केली आहे. तात्काळ तिकीट बुकिंग आजपासून सकाळी 8 ऐवजी सकाळी 10 वाजता सुरू झालंय. शिवाय प्रवासाच्या एक दिवस आधीच तात्काळ तिकीट काढता येईल. ज्या शहरातून प्रवास करायचाय त्याच शहरातून तात्काळ तिकीट काढावं लागेल. सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत IRCTC सह कुठल्याच रेल्वे एंजटला तिकीट काऊंटर किंवा इंटरनेटवर तात्काळ तिकीट बुक करता येणार नाही. तात्काळ तिकीट काढणार्‍यांसाठी वेगळी खिडकी असेल. या बुकिंग सेंटर्सवर सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले जातील.

close