‘एक था टायगर’च्या प्रोमोवर पाकमध्ये बंदी

July 10, 2012 6:18 PM0 commentsViews: 76

10 जुलै

अभिनेता सलमान खानच्या आगामी 'एक था टायगर' सिनेमाचे प्रोमो सगळीकडे दिसायला लागले आहे. पण पाकिस्तानात या प्रोमोजवर बंदी घातली आहे. पाकिस्तान गुप्तहेर एजन्सी आयएसआयचं नकारात्मक चित्रण या सिनेमात आहे. त्यामुळे द पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलॅरिटी ऑथॉरिटीने सिनेमाच्या प्रोमोजवर बंदी घातली आहे. सेन्सॉर बोर्डाचं नो ऑबजेक्शन सर्टिफिकेट मिळेपर्यंत तरी ही बंदी राहील असं म्हटलं गेलंय. सिनेमात सलमान खान रॉ एजंटच्या भूमिकेत आहे. आणि पाकिस्तानात एका प्रोफेसरवर नजर ठेवण्यासाठी सलमानला पाठवलं जातं. हा प्रोफेसर भारतातली मिसाइल सिक्रेट्स पाकिस्तानला विकतोय, अशी शंका असते. असं या सिनेमाचे कथानक आहे. हा सिनेमा यश राज फिल्म्सच्या बॅनर्सखाली तयार होत आहे.

close