पुण्यातही वसंत ढोबळेंसारखा अधिकारी गरजेचा – पाटेकर

July 10, 2012 6:22 PM0 commentsViews: 7

10 जुलै

एसीपी वसंत ढोबळेंसारख्या पोलीस अधिकार्‍याची पुण्यातही गरज आहे आणि ज्याप्रमाणे अरूप पटनायक हे ढोबळेंच्या मागे समर्थपणे उभे राहिले तसं चांगल्या स्पष्ट अधिकार्‍यांच्यापाठी वरिष्ठांनी उभं राहिलं पाहिजे, असं मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं. पुणे पोलिसांतर्फे अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित वेगवेगळ्या स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट, पुणे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ हजर होते. नेहमीप्रमाणे नाना पाटेकर यांनी सध्याचा गल्लाभरू सिनेमा, चांगला सिनेमा, बरबटलेलं राजकारण, बदलत चाललेलं समाजकारण अशा विषयांवर आपल्या शैलीत खुसखुशीत भाष्य केलं.

close