शिवसेनेचा महाराष्ट्र बंद , 1 डिसेंबरला

November 26, 2008 1:04 PM0 commentsViews: 1

26 नोव्हेंबर मुंबईमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातली प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंगच्या समर्थनार्थ शिवसेना महाराष्ट्र बंद पुकारला आहे. 1 डिसेंबरला शिवसेनेनं बंदचं आवाहन केलं आहे.आधीपासूनच शिवसेनेनं साध्वीला पाठिंबा दिला होता. आता साध्वीने पोलीस तपासातआपला छळ झाल्याचा आरोप केला आहे. सरकार तपासाच्या नावाखाली हिंदू संघटनांना बदनाम करत आहे असा शिवसेनेचा आरोप आहे. याकारणामुळे शिवसेनेनं बंदचं आवाहन केलं आहे.यापूर्वी 30 जुलै 2003मध्ये शिवसेनेनं मुंबई बंद पुकारला होता. मुंबईत घाटकोपर इथे 28 जुलैला बेस्ट बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यात 4 जण ठार तर 39 जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट सिमी या संघटनेनं केला असं पोलीस तपासात उघड झालं होतं. त्याच्या विरोधात हा मुंबई बंद होता. मात्र अग्नी या स्वयंसेवी संस्थेनं कोर्टात धाव घेतली. बंद पुकारून जनजीवन विस्कळीत करण्याचा शिवसेनेला अधिकार नाही असा दावा या संस्थेनं केला होता. तो हायकोर्ट आणि सुप्रिम कोर्टानं मान्य केला. त्यामुळे शिवसेनेला 20 लाख रुपयांचा दंड कोर्टात भरावा लागला होता. त्यानंतर शिवसेनेनं जाहीरपणे बंद पुकारला नव्हता. त्यापूर्वी 26 सप्टेंबर 2002मध्ये गुजरातमध्ये स्वामीनारायण मंदिरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला त्याविरोधात शिवसेनेनं देशव्यापी बंद पुकारला होता.

close