माधुरीला हवा पालिकेकडून भूखंड

July 11, 2012 9:58 AM0 commentsViews: 51

11 जुलै

धकधक गर्ल माधुरी दीक्षित अमेरिकेहुन परतल्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवुडमध्ये आपले नशीब आजमावून पाहत आहे. याचाच एक भाग म्हणून आता माधुरी मुंबईत डान्स ऍकाडमी सुरु करणार आहे. पण ही ऍकाडमी सुरु करण्यासाठी भूखंड मिळावा म्हणून मुंबई महापालिकेकडे मागणी केली आहे. त्यावर आता शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भूखंड देण्याची तयारी दर्शवली असल्याचं समजतंय. पण अशाप्रकारे माधुरी दीक्षितला भूखंड देण्याला विरोध होतोय.

डॉ.नेने यांच्याशी लग्न करुन भारताला बाय करत माधुरीकेत स्थिर झाली. पण काही महिन्यापुर्वीच माधुरी आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेहुन परतल्यानंतर बॉलिवुडसह तिच्या तमाम चाहत्यांना मोठा आनंद झाला. माधुरी परत आली म्हणून अनेकांनी तिचे स्वागतही केले. अनेक निर्माते-दिग्दर्शकांनी सिनेमासाठी बोलणी ही केली पण माधुरीच्या फि ची रक्कम ऐकुन निर्मात्यांना चांगलीच धडकीच भरली. एव्हान हेच नाही तर महाराष्ट्र पर्यटन खात्याचे ब्रँण्ड एम्बेसडर होण्यासाठी माधुरींने तब्बल साडेबार कोटी मागितले होते. पण पर्यटन खाते मात्र यासाठी तयार नव्हते आणि असणारही कसे. आता हे संपत नाही तोच माधुरींने डान्स ऍकाडमीसाठी मुंबई महापालिकेकडे भूखंडाची मागणी केली आहे. परंतु, महापालिकेत कुणीही यावरही बोलायला तयार नाही. प्रत्येक पक्षाची व्यक्ती म्हणतेय की, आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलून मगच प्रतिक्रिया देऊ…बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये गेल्या 20-22 वर्षांपूर्वी राज्य सरकारनं क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना असाच एक भूखंड अकडमी सुरु करण्यासाठी दिला होता. पण त्याठिकाणी अजूनही काहीही सुरु झालेलं नाही. त्यामुळे माधुरीला भूखंड देऊन, तिनं सांगितलेला उद्देश साध्य होणार का असाच प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

close