चव्हाण समर्थकांना भेटायला सोनिया गांधींचा नकार

July 11, 2012 4:09 PM0 commentsViews: 1

11 जुलै

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आता काँग्रेस पक्षात चांगला हादरा बसला आहे. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांच्या समर्थकांना भेटायलाच नकार दिला. गेल्या दोन दिवसांपासून चव्हाण यांचे नांदेड जिल्ह्यातले समर्थक दिल्लीत तळ ठोकून होते. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन अशोक चव्हाण यांच्यासाठी गार्‍हाणं मांडावं, अशी त्यांची इच्च्छा होती. दरम्यान, खुद्द अशोक चव्हाणसुद्धा दिल्लीत थांबून या घटनांवर नजर ठेवून होते. पण सोनिया गांधी यांनीच भेटीला नकार दिल्याने चव्हाण समर्थकांच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडलं. अखेर काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांची अवघ्या काही मिनिटांसाठीची वेळ चव्हाण समर्थकांना मिळाली. पण त्यांना मोहन प्रकाश यांच्याकडूनही कुठलंही ठोस आश्वासन मिळू शकलं नाही, असं सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळे एवढा गाजावाजा करून चव्हाणांच्या समर्थकांनी केलेला दिल्ली दौरा पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचं चित्रं समोर आलं.

close