भाडेकरुने वृध्द दाम्पत्याला घरात कोंडलं

July 11, 2012 10:18 AM0 commentsViews: 5

12 जुलै

औरंगाबादमध्ये एका वृध्द दाम्पत्याला त्यांच्याच घरामध्ये डांबून ठेवल्याचा खळबळजणक प्रकार उघड झालाय. धक्कादायक बाब म्हणजे वृध्द दाम्पत्याला त्याच्याच घरी भाडेकरु असलेल्या एका माजी पोलीस कर्मचार्‍यानीच डांबून ठेवले. 4 तास डांबून ठेवल्याचा धक्का सहन न झाल्याने 70 वर्षीय किशोर सरोदे यांना ह्रद्यविकाराचा धक्का आला. सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

शहारातील सिडको एन-1 मध्ये किशोर आणि अपर्णा सरोदे यांचे घर आहे. हे दोघेही वयोवृध्द असल्यानं आपल्या मुलीकडे राहतात. पोलीस प्रशिक्षण केंद्र चालवणार्‍या भगवान नागरे याला हे घर भाड्यावर दिलं होतं. मात्र एक वर्षसंपूनही वांरवार सांगूनही हा कर्मचारी घर सोडण्यास टाळाटाळ करत होता. या उलट पोलीस असल्याचा दबाव आणून या वृध्द दाम्पत्याला धमकावणे सुरु केले. घर सोडण्याची विनंती करायला गेलेल्या दाम्पत्याला भगवान नागरे यानं 4 तास डांबून ठेवले. शेजार्‍यांना माहिती कळताच हा प्रकार समोर आला. या प्रकरणी सिडको पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

close