पोलीस अधिकार्‍यांना नकोय नागपूरला पोस्टिंग

July 11, 2012 11:10 AM0 commentsViews: 2

11 जुलै

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर मध्ये पोलीस दलात अनेक महत्वाची पदं गेल्या अनेक महिन्यांपासून रिकामी आहेत. आवश्यक असलेल्या संख्येपेक्षा 42 टक्के पदं रिकामी असल्याची माहिती समोर आली आहे. पण नागपुरात पोस्टिंग होणे म्हणजे शिक्षा समजली जात असल्यामुळे पोलीस अधिकार्‍यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे सध्या असलेल्या पोलिसांवर कामाचा ताण वाढतोय. आणि गुन्ह्यांच्या तपासावरही त्याचा परिणाम झाला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षेचं वातावरण आहे. त्यातच पोलीस अधिकारी नागपूरमध्ये येण्यास इच्छूक नसल्याची धक्कादायक कबुलीच पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

नागपूर पोलिसांची दुरवस्था – 42 टक्के पदं रिक्त – डीसीपी- 2 पदं रिक्त- ऍडिशनल सीपी – 2 पदं रिक्त- एसीपी- 5 पदं रिक्त- पीआय- 37 पदं रिक्त- एपीआय – 137 पदं रिक्त- पीएसआय- 93 पदं रिक्त- पोलीस शिपाई – 421 पदं रिक्त

नागपूरला येण्यास टाळाटाळ का ?

- नागपूरमध्ये पोस्टिंग ही शिक्षा समजली जाते- वरिष्ठ अधिकारी विदर्भात यायला नाखूश – आजाराचं कारण सांगून रजा- राजकीय दबाव आणून बदली रद्द केली जाते

close