डिझेलचे दर भडकणार ?

July 12, 2012 1:17 PM0 commentsViews: 1

12 जुलैमहागाईनं होरपळलेल्या जनतेला आता पेट्रोलनंतर डिझेलच्या दरवाढीचा चटका बसण्याची शक्यता आहे. ही दरवाढ 19 जुलैनंतर होण्याची शक्यता आहे याबाबत सरकार ठाम आहे. पण 19 जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणुकी होत आहे त्यामुळे ही दरवाढ निवडणुकीनंतर होऊ शकते अशी माहिती पीटीआयने दिली आहे. या दरवाढीबदल पेट्रोलियम कंपन्यांनीही दुजोरा दिला आहे. आता फक्त कोणत्यादिवशी आणि किती ही दरवाढ होणार आहे याची वाट कंपन्या पाहत आहे.

डिझेलच्या किमतीत गेल्या एकावर्षापासून वाढ झालेली नाही. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना प्रतिलिटर 10 रुपये 33 पैशांचे नुकसान सहन करावे लागते. तर दुसरीकडे दरवाढीबाबत वर्षभरापासून मंत्रिमंडळाची कोणतीही बैठक झाली नाही. यापुर्वी माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षी बैठक होते असे पण या वर्षी प्रणव मुखर्जी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांची जागा रिकामाच आहे. अर्थखाते पंतप्रधानांकडे जरी असले तरी सुध्दा याबाबत कोणतीही बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे वर्षभरापासून रेंगाळलेली डिझेलची दरवाढ आता होण्याची दाट शक्यता आहे.

close