लैला खान भारतीयच;परवेझ राष्ट्रवादीचा कार्यकर्ता

July 11, 2012 12:22 PM0 commentsViews: 11

11 जुलै

बॉलिवूडची अभिनेत्री असलेली लैला खान 2011 पासून गायब होती, तिचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस घेत होते. पण आज अखेर मुंबई पोलिसांनी उघड केलं की परवेझ टाक यानं अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबियांचा खून केला. हा गुन्हा घडला लैला खानची आई शेलिना पटेलची मालकी असलेल्या इगतपुरीच्या बंगल्यामध्ये.

तारीख – 12 फेब्रुवारी 2011, ठिकाण – इगतपुरी, वेळ रात्री 8 वाजता…लैला खान या बॉलीवुडमधल्या अभिनेत्रीचा खून…तिच्यासोबतच तिची आई शेलिना आणि इतर चौघांची हत्या..आणि खून करणारा होता लैलाचाच सावत्र वडील.. परवेझ टाक.

परवेझ टाक नुकताच जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून आला होता. निवडणुकीत बरेच पैसे गेल्याने.. त्याला पुन्हा पैशांची गरज होती. तो लैलाच्या आईला पैसे मागत होता. आपण मुंबई सोडून काश्मीरला जाऊ.. असाही त्याचा आग्रह होता. या दोन मुद्द्यांवरून त्यांच्यात वाद झाला. आणि रागाच्या भरात त्याने लैला, आईला आणि भावंडांना लोखंडी सळईनं मारलं. ही सळईही आता पोलिसांना मिळाली. लैलाचे वडील.. म्हणजेच शेलिनाचे पहिला पती.. नादिरशाह याने पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केल्यामुळे क्राईम ब्रँचच्या तपासाला सुरुवात झाली. तिकडे काश्मीरमध्ये पळून गेलेला परवेझही पोलिसांच्या जाळ्यात सापडला. अखेरीस त्यानं स्वतःहूनच गुन्ह्याची कबुली दिली. मग क्राईम ब्रँच इगतपुरीच्या बंगल्यात जाऊन शोध घेतला. तिथे सहा मानवी सांगाडे मिळाले. त्यातला एक लैलाचा आहे, असा पोलिसांना विश्वास आहे. डीएनए चाचणीनंतर त्याची खात्री पटेल. लैलाची आई शेलिना हिनं 3 लग्न केली होती. आता पोलीस लैलाच्या घरी येणार्‍या लोकांची तपासणी करत आहेत. त्यावरून लैलाकडे एवढा पैसा कसा आला, याचा शोध लागेल. कोण होती लैला खान ?- लैलाचं खरं नाव रेश्मा पटेल- स्कॉलर्स ऍकॅडमी, पाचगणीमध्ये शिक्षण- बॉलीवुडमध्ये अभिनेत्री होण्याचं स्वप्न- 2005 पासून बॉलीवुडमध्ये स्ट्रगल- 2008 : राजेश खन्नांसोबत 'वफा' सिनेमात अभिनय- 2011 : इगतपुरीमध्ये हत्या झाल्याचा संशयकोण होती शेलिना ?- शेलिना पटेल लैलाची आई- शेलिना मुंबईत सांताक्रुझची रहिवासी- शेलिना मुंबईत समाजवादी पार्टीची पदाधिकारी- शेलिनाचा दिल्ली आणि मुंबईतल्या राजकीय वर्तुळांत वावर- शेलिनाचे 3 पती – नादीर पटेल, आसिफ शेख, परवेझ टाक- शेलिना आणि टाक यांच्या वादामुळे लैलाची हत्या- शेलिनाकडे सुमारे 8 कोटींची मालमत्तालैलाच्या कुटुंबियांची संपत्ती

- इगतपुरी बंगला – 2.5 कोटी- मुंबई : ओशिवरा फ्लॅट – 2.5 कोटी- मुंबई : लोखंडवाला गाळा – 3 कोटी- मीरारोड फ्लॅट – 50 लाख- मित्सुबिशी आऊटलँडर- महिंद्रा स्कॉर्पियो- दागिने – 2 कोटी रु.

close