पानशेत महापुरग्रस्तांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप

July 12, 2012 11:30 AM0 commentsViews: 6

12 जुलै

12 जुलै 1961 रोजी पुण्यातील पानशेत धरण फुटलं होतं. आज या घटनेला 51 वर्षं पूर्ण झाले आहेत. धरणफूटीच्या 51 वर्षानंतर 196 पूरग्रस्तांना आज प्रॉपर्टी कार्ड्सच वाटप करण्यात आलं. पुण्यात पानशेत पूरग्रस्तांच्या अनेक वसाहती आहेत. त्यापैकी एरंडवणा पूरग्रस्त वसाहतीमध्ये हे वाटप करण्यात आलं. प्रॉपर्टी कार्डमुळे मालकी हक्क प्राप्त झाला याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. पण पानशेत पूरग्रस्तांच्या व्यथा संपलेल्या नाहीत. वाढीवं बांधकामं नियमित करणं, आणखी बांधकाम विस्तार करायला परवानगी देणं, बांधकामाकरता कर्ज उपलब्ध करून देणं या मागण्या अजून अपूर्ण असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली.

close