परवेझने केली लैला खानची कुटुंबियांसह हत्या ?

July 11, 2012 1:23 PM0 commentsViews: 2

11 जुलै

बॉलिवुड अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबियांचा खून परवेझ टाक याने केल्याचं उघड झालंय. याबद्दल परवेझनं पोलिसांकडे तशी कबुली दिली आहे. लैलाच्या बंगल्यात सहा मानवी सांगाडे सापडले यामध्ये पाच महिला आणि एका पुरुषाचा सांगाडा आहे यातील एक सांगाडा हा लैलाचा असल्याची शक्यता पोलीस सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी व्यक्त केली आहे.लैला खान खून प्रकरणी पोलिसांनी तपासाचे च्रक फिरवत परवेझ टाकला घेऊन इगतपुरी येथील लैला खानच्या फार्महाऊसवर काल तपासणी केली. यावेळी पोलिसांना एकाच खड्यात सहा मानवी सांगाडे सापडले. हे सहा मानवी सांगाडे डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. परवेझनं लैला खान आणि तिच्या कुटुंबियांचा खून केल्यानंतर त्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हत्येसाठी वापरलेला लोखंडी रॉडही पोलिसांनी हस्तगत केलाय. तर दुसरीकडे लैला खानसह सहाही जण अजूनही बेपत्ता असल्याचं पोलिसांच्या दफ्तरी नोंद आहे. त्यामुळे डीएनए तपासणीच्या रिपोर्टनंतरच हे सांगाडे कुणाचे याची योग्य माहिती मिळू शकेल असंही हिमांशू रॉय यांनी स्पष्ट केलंय. परवेझनं संपत्तीच्या वादातून ही हत्या केली असावी, असा अंदाज मुंबई पोलिसांना आहे.

close