मुरुम चोरी प्रकरणी कंत्राटदार मनिष त्यागीला अटक

July 12, 2012 3:34 PM0 commentsViews: 46

12 जुलै

पिंपरी चिंचवड मुरुम चोरी प्रकरणी अखेर कंत्राटदार मनिष त्यागीला अटक करण्यात आली आहे. मनिषकडे शेकडो ब्रास मुरुम साठा आढळला असून पोलिसांनी हा साठा जप्त केला आहे. आतापर्यंत या प्रकरणी संदीप बोराडे, योगेश शेटे, योगेश भदाणे अशा 4 जणांना अटक करण्यात आली आहे. मुरुम चोरी प्रकरणाचा मुद्दा शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभेत उपस्थीत करणार आहेत. मुरुम चोरीकडे दुर्लक्ष करणार्‍या प्राधीकरण आणि महसूल अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा नाही तर आंदोलन करु असा इशाराही त्यांनी दिला. पिंपरीतल्या मुरूम चोरीचा मुद्दा सगळ्यात आधी आयबीएन लोकमतनं उचलून धरला.

close