कलमाडींची लंडन ऑलिम्पिकला जाण्याची इच्छा

July 12, 2012 4:48 PM0 commentsViews: 5

12 जुलै

कॉमनवेल्थ घोटाळ्यातीले मुख्य आरोपी सुरेश कलमाडी यांना आता लंडन ऑलिम्पिकला जाण्याची इच्छा झाली आहे. त्यासाठी कलमाडी यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अर्ज केला आहे. कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी कलमाडींनी नऊ महिने तिहार तुरुंगात हवा खाऊन जामीनावर बाहेर आले. कलमाडींना कॉमनवेल्थ घोटाळ्याची चौकशी जोपर्यंत सुरु राहिलं तोपर्यंत देश सोडून जाता येणार नाही असा आदेश कोर्टाने दिला होता. तसेच कलमाडींचा पासपोर्टही कोर्टाकडे जमा आहे. मात्र कलमाडींनी मला ऑलिम्पिकला जाऊ द्यावे अशी विनंती कोर्टाकडे केली आहे.

close