कर्नाटकात 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी संपन्न

July 12, 2012 5:03 PM0 commentsViews: 1

12 जुलै

कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून जगदीश शेट्टर यांनी आज मुख्यमंत्रीपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. गेल्या वर्षभरातील शेट्टर हे तिसरे मुख्यमंत्री आहेत. तसेच ईश्वरप्पा आणि आर अशोक या दोघांनी शेट्टर यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या अगोदरही भाजपमध्ये दोन उपमुख्यमंत्री शपथ घेण्याची प्रथा पार पडली आहे. आता राज्याला एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहे. त्याचबरोबर 31 मंत्र्यांनीही यावेळी शपथ घेतली. लोकायुक्तांच्या अवैध मायनिंग अहवालात ज्यांची नावं नाहीत त्यांनाच शेट्टर यांनी आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिलंय. या शपथविधी सोहळ्याला खाणसम्राट म्हणून ओळखले जाणारे रेड्डी बंधू मात्र गैरहजर होते.

close