युपीत ग्रामपंचायतीचा फतवा, प्रेमविवाह करण्यास बंदी

July 13, 2012 1:33 PM0 commentsViews: 1

13 जुलै

उत्तरप्रदेशमधील ग्रामपंचायतीनं एक अजब फतवा काढला आहे. गावातल्या तरुणींना प्रेमविवाह करणे आणि मोबाईल वापरण्याला बंदी घालण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे इथून पन्नास किलोमीटरवर , बागपत हा हवाई उड्डाण मंत्री अजित सिंग यांचामतदार संघ आहे. चाळीस वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या महिलांना मार्केटमध्ये खरेदी करायला जायलाही बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर गावातल्या मुलांनाही रस्त्यावरुन चालताना हेडफोन लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. घरातून बाहेर निघताना डोक्यावर पदर किंवा ओढणी घेतल्याशिवाय बाहेर पडू नये असाही फतवा आहे. त्याचबरोबर एक चांगली बाब म्हणजे हुंड्याच्या प्रथेवर त्यांनी आक्षेप घेतलाय आणि असं करणार्‍यांवर कठोर शिक्षा व्हावी असंही या ग्रामपंचायतीनं स्पष्ट केलं आहे.

close