उपराष्ट्रपतीपदासाठी हमीद अन्सारींना सपाचा पाठिंबा

July 12, 2012 5:10 PM0 commentsViews: 2

12 जुलै

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी विरुद्ध पी ए संगमा असा सामना रंगला असताना आता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक चर्चेत आहे. काँग्रेसनं पुन्हा एकदा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना उमेदवारी दिली आहे. उपराष्ट्रपतीपदासाठीचे काँग्रेसचे उमेदवार हमीद अन्सारी यांच्या उमेदवारीला समाजवादी पक्षाने पाठिंबा दिला आहे. तर एनडीएचे सदस्य नितीश कुमार यांनीही अन्सारींना पाठिंबा दिला आहे. पण डाव्या पक्षांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे.

close