13/7 साखळी बॉम्बस्फोटांना एक वर्ष पूर्ण

July 13, 2012 1:49 PM0 commentsViews: 1

13 जुलै

मुंबईत झालेल्या 13/7 साखळी बॉम्बस्फोटांना आज एक वर्ष पूर्ण झालंय. संध्याकाळी साडेसहा ते सातच्या सुमाराला दादर, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस या गजबजलेल्या ठिकाणी क्रमाने तीन बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटांत 21 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता आणि 100 हून अधिक जण जखमी झाले होते. याप्रकरणी संशयित म्हणून एटीएसने अतिरेकी नहीम, हरुन शेख हे तिघांना अटक केली. मात्र अजूनही या प्रकरणाबद्दल संपूर्ण खुलासा झालेला नाही. प्रत्येक बॉम्बस्फोट प्रकरणाप्रमाणे याही प्रकारचे ठोस पुरावे अजूनही पोलिसांच्या हाती लागू शकले नाही. आज बॉम्बस्फोट प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झालंय पण अजून कित्येक कुटुंबीयांच्या जखमा ओल्या आहे.

close