विधान परिषदेच्या जागेसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

July 13, 2012 3:30 PM0 commentsViews: 4

13 जुलैविधान परिषदेच्या 11 जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहे. उद्या अर्ज भरण्याची शेवटती तारीख आहे त्यामुळे कोणत्यापक्षातून उमेदवार मैदानात उतरणार हे उद्या स्पष्ट होईलच पण सध्या घोडेबाजार तेजीत आहे. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विलासराव देशमुख आणि नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

विलासरावांचे खास समजले जाणारेउल्हास पवार यांच्यासाठी विलासराव आग्रही आहे पण मुख्यमंत्र्यांचा विरोध याला विरोध आहे. तर आनंदराव पाटलांना उमेदवारी मिळावी म्हणून मुख्यमंत्री आग्रही आहे.दुसरीकडे चौथी जागा लढवायला मुख्यमंत्र्यांचा विरोध आहे पण इथे राजन तेली आणि रवींद्र फाटकांसाठी राणे आग्रही आहे. तसेच संजय दत्त यांच्या नावासाठी पक्षश्रेष्ठींनी नाव पुढं केलं आहे. मात्र या सगळ्या निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटलांमुळे घोडाबाजार तेजीत आला आहे. यामुळे विरोधी पक्ष मनसे, सपा आणि अपक्षांवर जयंत पाटलांची भिस्त आहे. तर दुसरीकडे शिवसेनेत अनिल परब आणि विनायक राऊत आघाडीवर असून परशूराम उपरकर यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

close