मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसात तक्रार

July 13, 2012 10:14 AM0 commentsViews: 1

13 जुलै

मंत्रालयाला लागलेल्या आगीची धग आज पुन्हा एकदा विधिमंडळ अधिवेशनात जाणवली. याप्रकरणी भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यात मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, तसेच चीफ फायर ऑफिसर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याप्रकरणी शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांनाही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर कोर्टात जाण्याचा इशाराही फडणवीस यांनी केला आहे.

close