आश्रमशाळेत सर्पदंश प्रकरणी संचालकावर गुन्हा दाखल

July 13, 2012 10:38 AM0 commentsViews: 3

13 जुलै

गोंदिया जिल्ह्यातल्या एका आश्रमशाळेत साप चावल्यानं दोन विद्यार्थ्यांना मृत्यू झाला होता. या प्रकरणी स्वामी राधाकृष्ण आदिवासी आश्रमशाळेच्या संचालका येरणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आश्रमशाळेचा चौकीदार एस.एस.कोरे आणि अधिक्षक एम एम बारस्क रला निलंबित करण्यात आलंय. 4 विद्यार्थ्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. या विद्यार्थ्यांवर बजाज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

गोंदिया जिल्ह्यात देवरी तालुक्यातील मकरधोकडा इथल्या आश्रमशाळेत काल गुरुवारी पहाटे झोपेत असतांना सहा विद्यार्थ्यांना साप चावला. काही तरी चावल्याचं या मुलांना कळलं. पण काही कळायच्या आतच एक विद्यार्थी दगावला. तर जवळच्या आरोग्य केंद्रात नेत असताना दुसर्‍या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ज्या आश्रमशाळेत सर्पदंशान दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला त्या आश्रमशाळेची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. विद्यार्थी फरशीवर खाली दाटीवाटीनं झोपतायत. खाली अंथरायला काही नाही. शंभर टक्के अनुदानित आश्रमशाळा असूनही सोयी सुविधेचा अभाव आहे. साहित्य नीट ठेवली जात नाही. बाथरुमची अवस्था अंत्यत वाईट आहे. दुर्गम, जंगल भागातील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी खाट किंवा पलंगची व्यवस्था असायला हवी. दरम्यान, या घटनेनंतर आता आदिवासी विकास खात्याचे सचिव आणि मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे.

close