उजनी धरणाचा पाणीसाठा खालावला

July 13, 2012 10:44 AM0 commentsViews: 77

13 जुलै

कमी पावसामुळे राज्यातील काही भागात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या उजनी धरणातील पाणीसाठ्याने निच्चांकी पातळी गाठली आहे. त्यामुळे शेतीसाठी उजनी धरणातून करण्यात येणारा पाणीसाठी आजपासून बंद करण्यात आलाय. तसेच 52 गावातील शेतीपंपाचं वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश, देण्यात आले आहे. या निर्णयामुळे सोलापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमधील 30 हजार बागायती क्षेत्र संकटात आलंय. उजनी धरणाच्या निर्मितीपासून आतापर्यंत जुलै महिन्यातील सर्वात निच्चांकी पाणी पातळी आहे. धरणात वजा 36 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

close