देवगडमध्ये बिबट्याचा मृतदेह सापडला

November 26, 2008 11:41 AM0 commentsViews: 3

26 नोव्हेंबर देवगडदिनेश केळूसकरदेवगड तालुक्यातल्या किंजवडे गावात एका चार वर्षाच्या बिबट्याचा मृतदेह सापडला आहे. या बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची चर्चा आहे. चार दिवसांपूर्वी एका बिबट्यानं किंजवडे गावातल्या दोघांवर प्राणघातक हल्ला केला होता. या बिबट्याला पिंज-यात पकडण्यासाठी गावक-यांचे प्रयत्न सुरू होते. याच हल्लेखोर बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या बिबट्याच्या शरीरावर दुखापतीच्या खुणा आढळल्या नाही. त्यामुळे त्याच्यावर विषप्रयोग झाला असावा, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

close